मुंबईच्या गोराई परिसरात खारफुटी संवर्धन केंद्र आणि उद्यान उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र वन विभागाकडून खारफुटी संवर्धन केंद्र आणि उद्यान उभारण्यात येणार आहे. शिवाय, या उद्यानात बोर्डवॉक, कायाकिंग, नेचर्स ट्रेल्स, इतर आकर्षणे असणार असून, निसर्ग व्याख्या केंद्र, खारफुटी मार्ग, पक्षी वेधशाळा देखील असणार आहे. जानेवारी २०२३ पर्यंत हे उद्यान नागरिकांसाठी उघडण्यात येणार आहे.
या उद्यानाच्या बांधकामासाठी २६.९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबत राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदिती ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. हे उद्यान पर्यावरण पर्यटन उद्योगाचे परिवर्तन करण्यासाठी राज्याच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना देईल.
गोराई परिसरातील या पहिल्या मॅंग्रोव्ह पार्कच्या कामाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य पर्यावरण पर्यटन मंडळानं या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, इको-टुरिझम प्रकल्प म्हणून घोषित केलं आहे. या प्रकल्पाला जिल्हा नियोजन समितीने (डीपीडीसी) निधी दिला आहे.