हवामान तज्ज्ञांच्या मते, नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून (monsoon) 26 मे रोजी केरळमध्ये (kerala) दाखल होण्याची शक्यता आहे.
यामुळे संपूर्ण भारतात उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले आहे की, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि लगतच्या प्रदेशांवर मान्सूनच्या (monsoon) पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अधिकाधिक अनुकूल होत आहे.
महाराष्ट्राच्या (maharashtra) अनेक भागांत मान्सूनपूर्व सरींनी यापूर्वीच हजेरी लावली आहे. वाढत्या तापमानापासून काहीसा तात्पुरता दिलासा दिला आहे.
तथापि, हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पुढील काही दिवसांत वादळी पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
विदर्भाबाहेरील प्रदेशांत तुरळक पाऊस पडत असला, तरी विदर्भातील रहिवाशांना मात्र अजूनही तीव्र उष्म्याचा सामना करावा लागत आहे.
IMD ने यापूर्वीच असा अंदाज वर्तवला होता की, मान्सून 26 मेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होऊ शकतो.
मात्र, या अपेक्षित तारखेच्या चार दिवस आधी किंवा नंतर मान्सूनच्या आगमनात थोडा फरक पडण्याची शक्यता आहे.
खाजगी हवामान संस्थांनीही असे नमूद केले आहे की, अरबी समुद्रावरील सध्याची वातावरणीय स्थिती आगामी दिवसांत मान्सूनच्या वाऱ्यांच्या वेगावर प्रभाव टाकू शकते.
साधारणपणे, मान्सून 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर 10 ते 12 दिवसांत महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकतो.
या वर्षी, जर वातावरणीय परिस्थिती अनुकूल राहिली, तर मान्सून 5 जूनच्या सुमारास दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत 27 मेपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
तथापि, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी सरी आणि पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
या पावसामुळे तापमानातही किंचित घट होण्याची शक्यता असून, सध्याच्या उष्मा आणि दमटपणापासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे.
हेही वाचा