हवामानातील बदलामुळे मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता

मुंबई - राज्यात सध्या हवामानात बदल दिसून येत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. थंडीनंतर आता पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

14 आणि 15 मार्च रोजी दक्षिण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विशेषत: 15 मार्चला विदर्भात तुरळक ठिकाणी वादळ होण्याची शक्यता असेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तर, मुंबई ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदवण्यात आल्यानंतर आता मात्र ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. काही ठिकाणी तापमान स्थिर आहे. कोकणात कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी थंडीची लाट आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात घट झाली आहे, अशी माहिती कुलाबा हवामान खात्याचे संचालक डॉ. कृष्णा होसालीकर यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या