Mumbai Rains: मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पाऊस, IMD चा इशारा

गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसेलल्या पावसानं आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडूनही मुंबई आणि ठाण्यात पुढील दोन तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २-३ तासामध्ये मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच पुढील चार ते पास दिवसात कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत पावसाची संततधार सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आला आहे. सुदैवानं पावसाचा अद्याप लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक सुरळीत सुरू आहे. पण पावसाचा जोर कायम राहिल्यास लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या