मुंबईत लवकरच पाच नवीन ठिकाणी Air Quality Monitoring Stations उभारण्यात येणार आहेत. ही केंद्रे SAFAR, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या 28 निरीक्षण केंद्रांमध्ये भर घालतील.
सध्या शहरात 14 CAAQM केंद्रे, 9 SAFAR केंद्रे आणि BMCची 5 केंद्रे कार्यरत आहेत. नव्या केंद्रांमुळे मुंबईत एकूण 33 CAAQM स्टेशन उपलब्ध होतील. तसेच हवा गुणवत्ता तपासणीसाठी BMC चार नवीन मोबाईल व्हॅन खरेदी करणार असून, सध्या महानगरपालिकेकडे फक्त एकच अशी व्हॅन आहे.
नवी केंद्रे खालील ठिकाणी उभारली जाणार आहेत:मुलुंड पश्चिम – सी. डी. देशमुख उद्यान
दादर पश्चिम – प्रमोद महाजन उद्यान
आरे–गोरेगाव पूर्व – छोटा काश्मीर
दहिसर पूर्व – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन मैदान
अंधेरी पश्चिम – के पश्चिम विभाग कार्यालय
मुलुंड, दादर आणि दहिसर या भागांमध्ये यापूर्वी केंद्रे नव्हती. विशेषतः दहिसरसारख्या मोठ्या भागावर कोणतेही निरीक्षण होत नव्हते.
नवीन CAAQM केंद्रांमधून कमी किमतीच्या सेन्सर-आधारित मॉनिटर्सपेक्षा अधिक विश्वासार्ह आणि अचूक डेटा मिळणार आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डेटवरील अवलंबित्वही कमी होईल. सध्या मुंबईत BMCची सहा केंद्रे आणि CPCBची 15 केंद्रे वापरात आहेत, तर उर्वरित केंद्रे IIT-बॉम्बे चालवते.
सध्या कार्यरत असलेली केंद्रे या भागांत आहेत:बोरिवली पूर्व, भायखळा, चाकला-अंधेरी पूर्व, चेंबूर, आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, कुलाबा, देवनार, घाटकोपर, कांदिवली पूर्व, कांदिवली पश्चिम, बांद्रा पूर्व, भांडुप पश्चिम, मझगाव, मालाड पश्चिम, मुलुंड पश्चिम, नेव्ही नगर, पवई, शिवडी, गोवंडी, सायन आणि विले पार्ले पश्चिम.
हेही वाचा