अाणखी एक दिवस मुंबई 'धुरक्यात'!

मुंबई महानगरातील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), अंधेरी, बोरीवली, नवी मुंबई अाणि माझगावसहित अन्य ठिकाणी लागोपाठ तिसऱ्या दिवशी सोमवारी खराब हवामानाची नोंद झाली. या खराब हवामानाकडे पाहता आणखी एक दिवस मुंबईत 'धुरक्यात' हरवणार आहे.

हवेचा दर्जा कसा?

हवा गुणवत्ता अाणि हवामान अंदाज संशोधन प्रणालीद्वारे (एसएएफएअार) सोमवारी पीएम २.५ हवामानाची नोंद करण्यात अाली. पीएम २.५ नुसार हवामान दर्जा निर्देशांक २०१ ते ३०० दरम्यान असेल तर हवेची गुणवत्ता अत्यंत खराब स्थितीत असल्याचं मानलं जातं. सोमवारी सकाळी ९ वाजता बीकेसीमध्ये हा निर्देशांक ३०८ तर अंधेरीत ३११, बोरीवलीमध्ये ३०२ अाणि बोरीवलीमध्ये ३१८ इतका होता.

अाणखी दोन दिवस प्रभाव

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी अाकाश निरभ्र होईल, पण येत्या दोन दिवसांत खराब हवामानाचा प्रभाव दिसून येईल. रविवारी वांद्रे येथे दुपारी ३ वाजता २१६ इतका क्यूए (हवामान हमी) होता. दिवाळीनंतर हा क्यूए सर्वात जास्त होता.

पुढील बातमी
इतर बातम्या