हवेची गुणवत्ता घसरली

मुंबईमध्ये हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय घसरण झाल्याचे दिसून आले आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये धुरकट वातावरण पसरल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एका दिवसात एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 94 वरून 127 पर्यंत वाढला आहे. त्यामुळे परिस्थिती “मध्यम” प्रदूषण श्रेणीत पोहोचली आहे.

साधारणपणे सकाळचं धुके दुपारपर्यंत कमी होते. मात्र यावेळी स्मॉग दुपारपर्यंत कायम राहिल्याने दृश्यमानता कमी झाली. यामुळे प्रवासावर परिणाम झाला. अनेक रहिवाशांनी रस्ते आणि निवासी भागात धुरकट वातावरण असल्याची तक्रार केली.

शहराचा एकूण AQI मध्यम श्रेणीत आहे. तरीही वाडतुक कोंडी आणि बांधकाम चालू असलेल्या भागांमध्ये काही निरीक्षण केंद्रांवर प्रदूषणाची पातळी अधिक नोंदवली गेली. सुरू असलेली बांधकामे आणि धूळ यामुळे सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसन किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी हवा सुधारत नाही तोपर्यंत बाहेर जाणे कमी ठेवावे, असा सल्ला दिला आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या