नवी मुंबई महानगरपालिका मियावाकी पद्धतीचा करणार वापर

(NMMC Commissioner Twitter)
(NMMC Commissioner Twitter)

नवी मुंबई महानगरपालिका शहरात मिनी जंगलं विकसित करणार आहे. ज्यासाठी ते मियावाकी पद्धतीचा वापर करणार आहेत. याच अंतर्गत एनएमएमसी (NMC) आयुक्त म्हणाले की, कोपरखैरणे इथल्या निसर्ग उद्यानात ४० हजार भारतीय झाडे लावली जात आहेत.

नवी मुंबईतील निसर्ग उद्यानात ४० हजार वृक्षांचं मियावाकी पद्धतीनं वृक्षारोपण सुरू आहे. सर्व स्थानिक प्रजाती आहेत ज्या पर्यावरणासाठी पूरक आहेत.

मियावाकी (जपानी वनस्पतिशास्त्रज्ञांच्या नावावर) पद्धतीत, अनेक मूळ प्रजाती एकमेकांच्या जवळपास लागवड केल्या जातात. ज्यामुळे झाडे बाजूला न वाढता वरच्या दिशेनं वाढतात. यामुळे वनस्पतींची वाढ चांगली होते आणि हिरवेगार जंगल उभे राहते. सर्व देशी प्रजाती स्थानिक पर्यावरणासाठी पूरक असतील.

एनएमएमसी ट्री अ‍ॅथॉरिटीनं यासाठी २०२१-२२ साठी ४३ कोटी रुपयांच्या बजेटचा अंदाज लावला आहे. या दरम्यान त्यांनी नवी मुंबईला उद्यान शहरात बदलण्यासाठी विविध उपाय योजना केल्या आहेत. हा सीएसआरद्वारे अनुदानीत प्रकल्प असल्याचं एनएमएमसी आयुक्त म्हणाले.

शिवाय, प्रशासकिय संस्थेनं बागांमध्ये शहरात नियोजित अशा अनेक शहरी वने विकसित करण्याची योजना आखली आहे.

गेल्या वर्षी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधान केले होते की, महानगरपालिकेच्या ६५ भूखंडांमध्ये आता भारतीय वंशाची ४ लाख  झाडे असतील आणि ती जपानी मियावाकी पद्धतीनं लावली जातील. ते पुढे म्हणाले की, हा 'ड्रीम प्रोजेक्ट' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केला आहे. शहरात जंगलं ही काळाची गरज आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या