पर्यावरणासाठी 'रोड रेंजर्स' सज्ज

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • पर्यावरण

मुंबई - मुंबईतील ' रोड रेंजर ' या तरूणांच्या ग्रुपने पर्यावरणाला वाचवण्यासाठी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे . तरुणांनी मुंबई ते गोवा या मार्गावर वृक्षारोपण करण्याचं ठरवले आहे. मुंबई ते गोवा हे 600 किमीचे अंतर सायकलवर पार पाडणार आहे. कोणतंही वृक्ष लावण्याची योग्य वेळ 20 वर्षा आधी आणि दुसरी योग्य वेळ आता. हीच वेळ साधत रोड रेंजर्स सज्ज झाले आहे. दिवसेंदिवस पर्यावरणात खूप वाढ झाली आहे. आपणच पर्यावरण दुषित करत आहोत, त्यामुळे वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला असल्याचं रोड रेंजरच्या टीमने सांगितलं. तसंच यासाठी सर्वांनीच हातभार लावाला असं आवाहनही त्यांनी या वेळी केलंय.

रोड रेंजर्सच्या या मोहिमेत सागर कांबळी, चेतन फावडे, अभिजित, आदेश म्हात्रे, शार्दूल तावडे यांच्यासह यांच्या संपूर्ण टिमचा समावेश आहे. या रॅलीची सुरुवात मकरसंक्रांतच्या मुहूर्तावर होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या