हवामान बदलाविषयी विद्यार्थ्यांची परिषद

नरिमन पॉइंट - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात हवामान बदलविषयक विद्यार्थ्यांची परिषद सोमवारी झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि सृष्टीज्ञान संस्था तसंच स्वीडनमधील क्लायमेट अॅक्शन संस्थेच्या सहयोगानं आयोजित या परिषदेमध्ये मुंबईतील शाळांतून 200 विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.

बदलत्या हवामानाची दखल घेत आपापल्या पातळीवर पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम शाळांमध्ये आयोजित केले जातात. या परिषदेमध्ये स्वीडनच्या क्लायमेट अॅक्शन संस्थेच्या वतीने कारिन वाहल्ग्रेन आणि रिकार्ड रेनबर्ग तसंच प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलं. पर्यावरण संवर्धनाचे हे उपक्रम मुंबई-ठाणे-पुणे-बारामती अशा प्रमुख भागांमधील शाळांमध्ये राबवले गेल्यास हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीला आळा घालण्याच्या दिशेनं अनुकूल वातावरणाची निर्मिती होऊ शकेल, असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. कार्यक्रमाचं आयोजन प्रशांत शिंदे, कुणाल अणेराव, ज्योती खोपकर यांनी केलं. सूत्रसंचालन संगीता खरात यांनी केलं. तर आभार युवराज प्रतिष्ठानचे कॅप्टन आशीष दामले यांनी मानले.⁠⁠⁠⁠

पुढील बातमी
इतर बातम्या