आरे काँलनीत वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाप्यांची धरपकड

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनी येथील वृक्षतोड करण्याच्या विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर महापालिकेनं पोलिसांच्या मदतीनं रातोरात जवळपास 700 झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे.  त्याला विरोध करत आंदोलन करणार्या 29 जणांवर आरे पोलिसांनी गुन्हा नोंदवत अटक केली आहे.

  आरेत रातोरात झाडांची कत्तल केली जात असल्याचे कळाल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी आरेत धाव घेतली आणि ठिय्या आंदोलन केलं. आंदोलन आणि आक्रमक पवित्र्यानंतरही झाडांची कत्तल थांबली नाही. पर्यावरण प्रेमींना न जुमानता पोलीस आणि प्रशासनाने कारवाई केली. आंदोलन करणाऱ्या जवळपास 100 ते 200  जणांना पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या आरेमध्ये तणावाचं वातावरण असल्याने पोलिसांनी सीआरपीसी 144 लागू  करत जमावबंदीचे आदेश दिले आहे. 

आरेचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या या परिसरात जाण्यासाठी पोलिसांनी बंदी घातली असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी त्या वेळी पोलिसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पोलिसांनी 29 जणांना अटक करत त्यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 353, 332, 143,149 नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या वेळी घटनेचे वृत्त प्रसारन करण्यासाठी गेलेल्या पञकारांना ही धक्काबुक्की करत ताब्यात घेतले होते. 


पुढील बातमी
इतर बातम्या