२४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • पर्यावरण

गेले अनेक दिवस गायब झालेल्या पावसानं शनिवारी चांगला जोर धरलेला आहे. मुंबईसह राज्यातील बऱ्याच ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेला अद्यापही थांबलेला नाही. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा, पालघर यांसारख्या सखल ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहे.

किती पाऊस पडला?

तसंच शनिवारी वांद्रे, अंधेरी, डोंबिवली, दादर, ठाणे, मुुुलुंड या ठिकाणी चांगलाच पाऊस झाला असून यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात गेल्या २४ तासांत १५.०८ मिमी पावसाची नोंद झाली असून कुलाबा भागात १०.०४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २४ तासांत कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २६ जूनपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. 

आतापर्यंत मुंबई आणि उपनगरात सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसंच येत्या २४ जूनपासून २७ जूनपर्यंत नियमित ३० ते ४० मिमी पाऊस पडणार आहे.

- महेश पालावत, स्कायमेट


हेही वाचा-

मुंबईत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचे!


पुढील बातमी
इतर बातम्या