'बीएनएचएस’च्या डिजिटायझेशनसाठी शासनाचा पुढाकार

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • पर्यावरण
पशुपक्ष्यांच्या विभिन्न प्रजातींचा निसर्ग आणि मानवाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. यामुळेच पशु-पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) मोलाचे कार्य करत आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोसायटीच्या डिजिटायझेशन प्रकल्पासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी घोषणा केली आहे. तसेच ‘बीएनएचएस’च्या हॉर्निमन सर्कल येथील इमारतीचा भाडेपट्टा करार लवकरात लवकर वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.
पुढील बातमी
इतर बातम्या