भारतीय खगोलप्रेमींसाठी यावर्षी 6 ग्रहणं

२०२० या वर्षात आगमन जालं आहे. या वर्षात ३६६ दिवस आहेत. याचं कारण म्हणजे ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार दर चार वर्षांनी येणारं लीप इयर. या वर्षात एकूण सहा ग्रहणं, सुपर मून दर्शन, ब्ल्यू मून योग देखील आहेत. त्यामुळे खगोलप्रेमी २०२० मध्ये दिसणा‍ऱ्या विलोभनीय दृश्याचे साक्षीदार होणार आहेत.

२०२० मधील चंद्र आणि सूर्य ग्रहणं

यावर्षी एकूण दोन सूर्यग्रहणं आणि चार चंद्रग्रहणं आहेत

  • १० जानेवारी :  भारतातून चंद्रग्रहण दिसणार
  • २१ जानेवारी : कंकणाकृती सूर्यग्रहण पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड मध्ये दिसेल तर इतरत्र खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल
  • ५ जून : चंद्रग्रहण भारतातून दिसणार
  • ५ जुलै : चंद्र ग्रहण भारतातून दिसणार
  • ३० नोव्हेंबर : चंद्रग्रहण भारतातून दिसणार
  • १४ डिसेंबर : खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही

सुपर मून, ब्ल्यू मून योग कधी?

७ एप्रिल दिवशी भारतीयांना सुपरमूनचे दर्शन होणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र ३ लाख ५६ हजार ९०७ किमी. इतका पृथ्वीच्याजवळ येईल. त्यामुळे चंद्र १४ टक्के मोठा आणि जास्त तेजस्वी दिसणार आहे. २०२० मध्ये १ आणि ३१ ऑक्टोबर दिवशी पौर्णिमा असल्यानं या दिवशी ‘ब्ल्यू मून' दिसेल.


पुढील बातमी
इतर बातम्या