मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • पर्यावरण

उन्हाचा पारा आणि वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांनी बुधवारी सकाळी काही प्रमाणात गारवा अनुभवला. गेल्या दोन दिवसांप्रमाणे बुधवारी सकाळीही मुंबईत ढगाळ वातावरण होतं. तर काही ठिकाणी रिमझीम पाऊसही पडला.

हवामान खात्याचा अंदाज

केरळमध्ये २९ मे रोजी मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईतही यंदा वेळेवरच पाऊस पडणार असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ ते २८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

मे महिन्यात घ्या पावसाचा आनंद

सकाळी पडलेल्या रिमझीम पावसामुळे संपूर्ण मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र, येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच २८ मे आणि २९ मे रोजी देखील रिमझीम पाऊस पडण्याची शक्याता आहे', असा अंदाज खाजगी हवामान संस्था स्कायमेटने वर्तवला आहे. त्यामुळे मे महिन्यात मुंबईकरांना पुन्हा रिमझीम पावसाचा आनंद घेता येणार आहे.


हेही वाचा - 

खूशखबर! मुंबईत मान्सूनचं अागमन वेळेवरच

मच्छिमारांनो सावधान! 'सागर' चक्रीवादळ येतंय...

पुढील बातमी
इतर बातम्या