आजही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, येलो अलर्ट जारी

भारतीय हवामान विभाग (IMD) ने 'येलो' अलर्ट जारी केला आहे, जो शहर आणि उपनगरातील वेगळ्या भागांमध्ये जोरदार ते अतिवृष्टीची शक्यता दर्शवितो. सोमवारपेक्षा मंगळवारी जोरदार पाऊस कोसळेल असं IMD नं म्हटले आहे. 

IMD च्या नियमांनुसार, 24 तासांत 64.5mm आणि 115.5mm दरम्यानचा पाऊस 'अधिक' मानला जातो आणि 115.6mm आणि 204.4mm दरम्यानचा पाऊस 'खूप अधिक' मानला जातो.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. दिवसाच्या पहिल्या सहामाहीत उत्तरार्धापेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, सरी मध्यम ते मुसळधार असण्याची शक्यता  हवामानशास्त्र विभागाचे संशोधक अक्षय देवरस यांनी हिंदुस्तान टाईम्सकडे व्यक्त केली. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे उत्तर ओदिशा व लगतच्या दक्षिण झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात येत्या ५ दिवसात पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

सध्या कोकणामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली आहे. त्यामुळे धोकादायक भागातल्या नागरिकांच्या स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खालापूर, खोपोली, पेन या भागातही पावसाने हजेरी लावलेली आहे. आगामी चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे व या परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या