जम्मू काश्मीरचे पर्यटन वाढेल - मेहबुबा मुफ्ती

जुहू - दहशतवादी हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीरमधल्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होतोय. त्यामुळे पर्यटण वाढीसाठी शुक्रवारी जे. डब्लू. मॅरियेट येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रास जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी उपस्थिती लावली होती. तर विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती होती.

"दहशदवादी कारवायांमुळे जम्मू काश्मीरचे पर्यटन घसरत चालले आहे. पण आम्ही दहशदवाद कमी करण्याच्या प्रयत्न करत आहोत. पर्यटकांसाठी संरक्षण देण्यात येणार आहे. आशा आहे की इथले टुरिजम लवकरच सुधारेल," असे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी चर्चासत्रात सांगितले. तसेच या वेळी जम्मू काश्मीरवर आधारित विजय वर्मा आणि इम्रान खान निर्मित 'सर्गोशियन कुच केहता है' या हिंदी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या