अखेरचा हा तुला दंडवत !

मुंबई - अहोरात्र देशाची सेवा करणारी आयएनएस विराट युद्धनौका अखेर निवृत्त झाली. 6 मार्च या दिवशी एकिकडे सूर्यास्त झाला. तर दुसरीकडे तब्बल 30 वर्ष सेवा करणाऱ्या या युद्धनौकेच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला आहे. भारताच्या दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेच्या डीकमिशन सोहळ्यासाठी या बोटीवर कार्यरत असलेल्या आजीमाजी सगळ्याच अधिकाऱ्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं.

भारतीय नौदलात दाखल होण्यापूर्वी विराटने रॉयल नेव्हीत एचएमएस हर्निस म्हणून काम केलं होत. म्हणूनच विराटला अखेरची मानवंदना देण्यासाठी त्या अधिकाऱ्यांनाही आमंत्रण देण्यात आलं होत. या वेळी रॉयल नेव्हीच्या फर्स्ट सी लॉर्ड आणि एचएमएस हर्निसचे जुने शिलेदार देखील हजर होते.

आता या युद्धनौकेच संग्रहालय बनवलं जाईल की हिलादेखील विक्रांत प्रमाणे भंगारात विकलं जाईल हे कुणालाच माहीत नाही. आयएनएस विराटची निवृत्ती ही सगळ्यांनाच नको अशी घटना होती. पण ती काळाची गरज देखील होती.

पुढील बातमी
इतर बातम्या