शिखर-17 क्रीडा महोत्सवाचे आयोजन

वांद्रे - कलानगर इथल्या चेतना महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन 'क्रीडा महोत्सव शिखर-17' चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन बुधवारी बीएमएस कोऑरडिनेटर प्रोफेसर तकदिश पावसकर आणि बीएमएस असिस्टंट चीफ कोऑरडीनेटर भावेश वैती यांनी केले.

शुक्रवारपर्यंत आयोजित या क्रीडा महोत्सवात एकूण 32 खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील 250 महाविद्यालयाच्या 700 विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आहे. स्मॅश क्रिकेट, बॉक्स-क्रिकेट, फुटबॉल, थ्रोबॉल, रश्शी खेच, खो-खो, बॅडमिंटन, बुद्धीबळ, टेबल टेनिस, कॅरम, खजिना शोधाशोध, मेहंदी, रांगोळी, मेकअप स्पर्धा, नेलआर्ट, टी-शर्ट पेंटिंग या खेळाचे आयोजन केले आहे. विजेता स्पर्धकांना शुक्रवारी पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या