'मिस वॉव’ सौंदर्यस्पर्धेतून उदयोन्मुख प्रतिभेचा शोध

फॅशन, जीवनशैली, करमणूक क्षेत्रातील समकालीन आणि आधुनिक प्रतिभेचा शोध घेत त्याला वाव मिळवून देण्यासाठी ‘मिस वॉव’ ही सौंदर्यस्पर्धा २४ डिसेंबरला होणार आहे.

सूरतमध्ये होणार स्पर्धा

२०१४ पासून दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेतील विजेत्यांना मुकुटाचा मान तर मिळतोच. पण त्याचबरोबर त्यांना फॅशन आणि मनोरंजन विश्वात अधिक चांगले भवितव्यही प्राप्त होते,” असे उद्गार ‘मिस वॉव २०१७’चे संस्थापक ओर्नोब मोइत्रा यांनी काढले. वांद्र्यातील कॉफी कल्चर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही स्पर्धा सूरतमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली.

म्हणून या स्पर्धेचं आयोजन

‘मिस वॉव’चा विस्तार हा संपूर्ण भारतभर झालेला आहे. यावेळी तृतीयपंथींच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर व्हावा याच उद्देशातून ही स्पर्धा घेतली जाते. २०१५ पासून आयोजकांनी सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये पाण्याची बचत, तंबाखूविरोधी मोहीम आणि डिस्लेक्सिक मुलांच्या मदतीसाठीच्या मोहीम राबवल्या गेल्याचं ओर्नोब मोइत्रा यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या