हजरत पीर बाबांच्या उरुसाचा उत्साह

सँडहर्स्ट रोड - हजरत सय्यद पीर बाबा यांच्या उरुसाचं आयोजन सोमवारी संध्याकाळी सरदार वल्लभभाई पटेल रोड येथील दर्ग्यात करण्यात आले होते. या वेळी हजरत पीर बाबांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले होते. सँडहर्स्ट रोड भागातील इमामवाडा, डोंगरी ते चारनळ अशी ही मिरवणूक काढण्यात आली. मागील 50 वर्षांपासून ही मिरवणूक काढली जाते. यंदाही येथील मुस्लीम बांधवांनी हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. यामध्ये 150 हून अधिक जण सहभागी झाले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या