हशू अडवाणी यांची 91 वी जयंती साजरी

चेंबूर - स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीत हशू अडवाणी यांची 91 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

हशू अडवाणी हे नागरी वेशातील संत होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते कार्यरत होते. हशू अडवाणी यांनी मुंबईत 120 स्केवर फुटाच्या घरात राहून देशसेवा केली आणि त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. स्वामी विवेकानंद सोसायटी ही त्यातीलच एक संस्था असून सर्व प्रकारचे शिक्षण या संस्थेतून दिले जाते. या संस्थेच्या आता एकूण 26 संस्था आहेत. संस्थेत 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसंच स्वामी विवेकानंद सोसायटीत लवकरच वैद्यकीय महाविद्यालय बनवण्यात यावं यासाठी सरकार पूर्ण मदत करेल असं आश्वासन या वेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

पुढील बातमी
इतर बातम्या