पत्रकारितेचं मूल्य कमी होतंय - तोरसकर

सीएसटी - पुस्तकांच्या कागदांची किंमत अधिक असूनही पुस्तक खापण्याचं प्रमाण जास्त आहे. वाचकांचा कल हा पुस्तक खरेदीकडे असून त्यांनी वर्तमानपत्रांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे कुठे आणि काय चुकतंय हा विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसकर यांनी पत्रकारांचे कान टोचले आहेत. पूर्वी वर्तमानपत्रं जपून ठेवली जात, मात्र सध्या वर्तमानपत्रं वाचून झाल्यानंतर सरळ रद्दीत जातात. पूर्वीच्या तुलनेत सध्या वर्तमानपत्रांचं मूल्य कमी होत असल्याची खंत तोरसकर यांनी व्यक्त केली.

मुंबई मराठी पत्रकार संघात 6 जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. पत्रकारितेची ताकद राजकीय मंडळीही रोखू शकत नाहीत, पत्रकारितेचा आवाज मोठा आहे, मात्र सध्या तो  पोहचत नाही, असं सांगून त्यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या वेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिला जाणारा अप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार आयबीएन लोकमतच्या स्वाती लोखंडेंना देण्यात आला. नंदकुमार पाटील यांना जयहिंद प्रकाशन पुरस्कार, सकाळचे  गोविंद तुपे यांना सरमळकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्सचे मुकुंद कुळे यांना विदयाधर गोखले स्मृती पुरस्कार आणि लोकसत्ताचे उमाकांत देशपांडे यांना नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कारानं गौरवण्यातही आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या