मुंबई - प्रजासत्ताक दिनाला होणारी परेड आता या वर्षापासून मरिन ड्राईव्ह ऐवजी शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. मंगळवारी राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला. सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं या वेळी स्पष्ट करण्यात आलं. यापूर्वी 2014 मध्ये प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मरिन ड्राईव्ह येथे आयोजित करण्यात आला होता.