आई महोत्सवाला सिंधुताईंची हजेरी

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • कार्यक्रम

चांदिवली - गणेश मैदानात आयोजित आई महोत्सवात समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी हजेरी लावली. आई महोत्सवात सलग तीन दिवस उपस्थिती लावलेल्या आई आणि मुलाच्या जोडीच्या नावाची सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. विजेत्या तीन महिलांचे त्यांच्या मुलांनी पूजन केले. तसंच या आई मुलाच्या जोडिला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.

सिंधुताई सपकाळ यांनी महोत्सवात 'आईच्या काळजातून' या विषयावर आत्मकथन केलं. माईंच्या आयुष्यातील खडतर प्रवास ऐकून उपस्थित चांदिवलीकर भावूक झाले. माणूस म्हणून जगा, समोरच्याला माफ करायला शिका ही मोलाची शिकवण माईंनी यावेळी दिली.

या वेळी स्थानिक नगरसेवक इश्वर तायडे यांच्या प्रयत्नानं सहा दिव्यांग महिलांना घरघंटीचं प्रमाणपत्रदेखील माईंच्या हस्ते देण्यात आलं. तसंच तायडे यांच्या मातोश्री सुभद्राबाई यांचा चांदिवली म्हाडा विकास समितीच्यावतीनं आदर्श माता पुरस्कार देऊन माईंच्या हस्ते गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला साकिनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी विशेष उपस्थिती लावली.

पुढील बातमी
इतर बातम्या