सुभाष चंद्रांचा 'द Z फॅक्टर'

परळ - शुक्रवारी परळ पूर्व येथील आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल येथे मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून एस्सेल गृपच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या वेळी नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुभाष चंद्रा यांच्या 'द Z फॅक्टर' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

उद्योजकता, तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि संशोधन या चार गोष्टी ज्यांनी आपल्या आयुष्यात आत्मसात केल्या ते म्हणजे खासदार आणि एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केलं. तर, चंद्रा यांच्या 'माय जर्नी अॅज द राँग मॅन अॅट द राईट टाईम' या इंग्रजी आत्मचरित्राचा मराठीत अनुवाद केलेलं 'द Z फॅक्टर' हे आत्मचरित्र तरुण उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

चंद्रा यांनी नेहमी हाताचे न राखता मैत्री केली आणि संघर्ष केला तो देखील टोकाचा. त्यांची मैत्री आणि संघर्ष अशा दोन्हींचा सामना आपण केल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. तर चंद्रा यांनी लिहिलेल्या पुस्तकामधून मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल त्याचबरोबर पाठ्यपुस्तक म्हणून त्याचा उपयोग होईल, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या