‘याल तर हसाल’ शुद्ध मराठीत

शिवाजी मंदिर - ‘याल तर हसाल’ या एकपात्री विनोदी नाटकाचा बुधवारी 644 वा प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिर येथे झाला. या एकपात्री विनोदी नाटकांचं लेखन संजीवन म्हात्रे आणि निर्मिती शेखर म्हात्रे यांनी केलीय.

महाराष्ट्रभर 643 प्रयोग झाल्यानंतर हा 644 वा प्रयोग मुंबईत शिवाजी मंदिर येथे सादर झाला. हे एकपात्री नाटक पूर्णपणे आगरी भाषेत असून सादरीकरणातही संपूर्ण आगरी भाषाच वापरली जाते, परंतु मुंबईत हा प्रयोग करताना काही बदल करून शुद्ध मराठी भाषा वापरण्यात आली.

रसिक मायबाप हीच आमची दौलत आहे. आमची कला त्यांच्यापर्यंत पोहचणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे भाषेत बदल करावा लागला. हा शुद्ध मराठीतला पहिलाच प्रयोग असल्याचं आणि समाजातल्या जुन्या-नव्या घटनांबाबत रसिकांमध्ये प्रबोधन होण्याची गरज आहे. अशा घटना हास्य-विनोदातून पोहचाव्यात, यासाठी हा एक प्रांजळ प्रयत्न असल्याचं या वेळी लेखक आणि सादरकर्ते संजीवन म्हात्रे म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या