घरातल्या वस्तू वापरून काढा अशी सुंदर रांगोळी !

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

'दिवाळी' हा सर्वांचाच आवडता सण! दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके याबरोबरच रांगोळीही आलीच. दारासमोर सुरेख आणि सुंदर रांगोळी काढावीशी वाटते. पण चांगली रांगोळी काढता येत नाही, म्हणून बऱ्याच जणींचा हिरमोड होतो. पण आज आम्ही तुम्हाला घरात असलेल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी वापरून अतिशय सुंदर रांगोळी कशी काढता येईल? हे सांगणार आहोत.

1) प्रत्येकाच्या घरात केस विंचरण्यासाठी कंगवा म्हणजे फणी वापरलीच जाते. पण याच फणीचा वापर करून अतिशय सुंदर अशी रांगोळी काढता येते याचा तुम्ही विचार तरी केला आहे का? नाही तर मग हा व्हिडीओ नक्की बघा. फणीचा वापर करून तुम्ही अशी मस्त रांगोळी काढू शकता.

2) हातात घातल्या जाणाऱ्या बांगडीचा वापर करूनही आपण अतिशय सोप्या पद्धतीने पण तितकीच सुंदर रांगोळी काढू शकतो. बांगड्यांचा वापर करून रांगोळी कशी काढता येईल? हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

3) संस्कार भारती रांगोळी सगळ्यांनाच आवडते. पण ती रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला नक्षीकाम यायला हवं, असं सगळ्यांनाच वाटतं. पण तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल, पण आवड असेल तर तुम्ही तुमच्या बोटांचा एका विशिष्ट प्रकारे वापर करून आणि सध्या लाकडाच्या काडीचा वापर करून ही सुंदर रांगोळी काढू शकता. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ नक्की पहा.

4) काही जणींना दारासमोर खूप मोठी रांगोळी न काढता दाराच्या उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याला लागून साधी आणि छोटी रांगोळीची पट्टी काढायला आवडते. तुम्हालाही तशीच रांगोळी आवडत असेल, तर खूप साधे ट्रिक्स आणि आपल्या बोटांचा वापर करून खूप सोपी पण सुंदर अशी रांगोळी काढता येऊ शकते...


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या