सावधान...दिवाळीत भेसळखोरही झालेत सक्रिय

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - मुंबईकरांनो सावधान...तुमची ही दिवाळी सुरक्षित व्हावी, यासाठी अन्नपदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घ्या. कारण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोरही सक्रिय झाले असून बाजारात भेसळयुक्त मिठाई, खवा, मावा, दूध, तूप, तेल, बेसन, रवा, चणाडाळ मोठ्या प्रमाणात विक्रीस आलीये. दोन आठवड्यांत एफडीएनं मुंबईभर छापे घालून 44 लीटर भेसळयुक्त तूप, सुमारे 700 किलो भेसळयुक्त तेल जप्त केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. संशयावरून दुधाचे 8 तर रवा, मैदा, बेसन, खवा-माव्याचे 100 हून अधिक नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. भेसळयुक्त 43 हजार रुपयांचा खवा-मावाही जप्त करण्यात आलाय.

मिठाई आणि अन्नपदार्थ घेताना ही काळजी घ्या 

खवा-मावा-मिठाई ताजी आहे का याची खात्री करा

खवा-मावा-मिठाईचा वास घेऊन पहा. कुबट वास असल्यास खवा भेसळयुक्त, शिळा असेल

उघड्यावरील मिठाई, अन्नपदार्थ खरेदी करू नका

नोंदणीकृत-परवानाधारक दुकानातूनच अन्नपदार्थ खरेदी करा

घेतलेल्या सामानाचं बिल घ्या

बंगाली मिठाई 10 तासांतच खा

भेसळ आढळल्यास लगेच एफडीएशी संपर्क साधा

खवा आणि दुधातली भेसळ अशी ओळखा 

वासावरून खवा-मावा शिळा आहे का ते समजतं. मात्र त्यात भेसळ, स्टार्च आहे का हे ओळखण्यासाठी त्यात आयोडिनचे दोन थेंब टाका. भेसळ असलेल्या खव्याचा रंग आयोडिनच्या थेंबांमुळे निळा होतो.

भिंतीवर टाकलेलं दूध सरकन खाली आलं की समजा त्यात भेसळ आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या