फ्लाइंग लॅम्पवर बंदीची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - मकर संक्रांत आणि दिवाळीत आकाशात फ्लाइंंग लॅम्प उडवण्याचा ट्रेण्ड काही वर्षांपासून सुरू झाला आहे. हा ट्रेण्ड सुरक्षेच्या दृष्टीनं महागात पडू शकतो. आग लागण्याच्या भीतीबरोबरच दहशतवादी कृत्यासाठी फ्लाइंग लॅम्पचा वापर होऊ शकतो असं म्हणत प्रमुख अग्निशमन अधिकारी प्र. सु. रहांगदाळे यांनी थेट पोलीस आयुक्तांच साकडे घालत यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसंच फ्लाइंग लॅम्प उडवण्याऱ्यांबरोबर विक्री आणि साठा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळं ही मागणी मान्य झाली तर यंदा दिवाळीत फ्लाइंग लॅम्प उडताना दिसणार नाहीत. पण त्याहीपेक्षा कुणी नकळतही फ्लाइंग लॅम्प उडवला, विक्री केली तर त्याला हे चांगलंच महागात पडू शकतं.

दिवाळीदरम्यान आग लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या तीन वर्षात वाढ झाली आहे. त्यातही फ्लाइंग लॅम्पमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.

गेल्या तीन वर्षातील दिवाळीदरम्यान लागलेल्या आगींची आक़़डेवारी

2013 - 49

2014- 69

2015- 99

पुढील बातमी
इतर बातम्या