दिवाळीपासून 'बेस्ट' प्रवास !

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाईफलाईन ठरलेल्या बेस्टमधील प्रवाशांची संख्या हळूहळू कमी होेत चालली आहे. त्यामुळे आता बेस्टने प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी नवनवीन योजना हाती घेण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून आता बेस्टने टेक्नोसॅव्ही होण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट बसेसचं वेळापत्रक, त्यांचे थांबे, तिकीट काढणे किंवा तिकीटदराची माहिती मिळणे यासाठी आता मोबाईल अॅपची मदत घेण्यात येणार आहे. ट्रायमॅक्स कंपनीकडे हे अॅप तयार करण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे.

अॅपवर कोणत्या सेवा मिळणार?

बसचे वेळापत्रक

बस येण्याचा अंदाजे कालावधी

बसचे थांबे

बसचे तिकीट काढणे

तिकीट दरांविषयी माहिती

दिवाळीपर्यंत या योजनेचा शुभारंभ करण्याचे बेस्टने ठरवले आहे. पण फोनवरून तिकीट घेणे किंवा अॅपद्वारे माहिती मिळवणे हे सर्वच प्रवाशांना शक्य नसल्याचे म्हणत समिती सदस्यांनी या योजनेला विरोध केलाय. ट्रायमॅक्स सर्वच बाबतीत फेल ठरली आहे. त्यामुळे या कंपनीला वाचवण्यासाठी या योजनेचा घाट घातल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्यांनी केला आहे. बेस्ट प्रशासन मात्र ट्रायमॅक्स कंपनीद्वारेच ही योजना राबवण्यावर ठाम आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या