मुंबईतील बाप्पा जम्मू-कश्मीरच्या पुंछ मंदिरात विराजमान

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

'बॉर्डरचा राजा' (Border Cha Raja) हा मुंबईहून जम्मू-कश्मीर मधील पुंछ इथल्या मंदिरात विराजमान झाला आहे. ही पहिलीच वेळ नसून याआधी सुद्धा पुंछ इथं बाप्पा मुंबईहून पाठवण्यात आला होता. किरनबाला ईशर यांना इश्वर दिदी नावानं ओळखलं जात. त्या गेल्या सहा वर्षांपासून एनजीएओच्या अंतर्गत प्रोग्रेसिव्ह नेशनच्या माध्यमातून बाप्पा साकारत आहेत.

पुंछच्या मंदिरात हा बाप्पा सैनिकांसह त्यांच्या परिवाराची रक्षा करण्यासाठी स्थापन केला जातो. मी आणि माझ्या परिवाराचा गणपती बाप्पावर खुप विश्वास आहे. मी आर्मी परिवारातील असून हा बाप्पा गेल्या ६ वर्षांपासून माझ्या हातून घडवला जात आहे. गणेशोत्सव हा माझ्यासाठी महत्वाचा सण आहे, अशा भावना किरनबाला यांनी व्यक्त केल्या.

किरनबाला यांची इच्छा आहे की, गणपती भारतीय सैनिकांच्या मार्गात येणारे सर्व त्रास दूर करतील. सोबतच दोन्ही देशातील तणाव दूर होईल. जेणेकरून दोन्ही देशांतील स्थानिक लोक सुरक्षित राहू शकतील.

बाप्पाची मुर्ती ही कलाकार विक्रांत फडतरे यांनी साकारली आहे. ती गेल्या ६ वर्षापासून कुर्ला इथं बनवली जाते. यंदाच्या वर्षी फडतरे यांनी गणेशमुर्तीसाठी एक स्पेशल डेकोरेशन सुद्धा तयार केलं आहे.

सजावटीबद्दल बोलताना ईशर म्हणाले, "बाप्पा भारत पाकिस्तान सीमेवर जात असल्यानं, आम्हाला मुंबईत राहणाऱ्या लोकांना या दृश्याद्वारे जाणीव करून द्यायची आहे की, देश हा अफगाणिस्तानची राजधानी तालिबाननं ताब्यात घेतलेल्या सीमेपासून फक्त ६०० किलोमीटर दूर आहे. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की तिथे किती भीती आहे."

सुंदर मूर्तीमागील कलाकार पांड्रे यांनी अभिमान व्यक्त केला की, त्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींची जम्मू -काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांपासून पूजा केली जाते.


पुढील बातमी
इतर बातम्या