छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हल 'या' दिवशी आयोजित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

'छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल २०२२' येत्या १४ ते १६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यात नामांकित कला संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या सहयोगानं विविध सामाजिक संकल्पनांवर आधारित 'कलाशिल्प सादरीकरण' केलं जाणार आहे.

पार्क परिसराच्या भोवताली कलाकारांच्या कलात्मकतेतून कलाकृतींची सजावट करण्यात येणार आहे. खाद्य रसिकांसाठी खाद्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर सागर किनारी स्वर सागर व्यासपीठाच्या माध्यमातून संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित, नावाजलेल्या व्यक्तींच्या यशोगाथा तसंच महत्वाच्या विषयांवर त्यांचे विचार ऐकण्यासाठी संवाद कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कलेसोबत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या शौर्याच्या यशोगाथा आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी 'गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन' तसेच 'ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शना'चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध कलास्पर्धांचे आयोजन या कला महोत्सवाच्या निमित्तानं करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला विनामूल्य व्यासपीठ सदर कलामहोत्सवाच्या निमित्तानं उपलब्ध होणार आहे. पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारण्यात येत आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या