विघ्नहर्ता २०२० : चिंचपोकळीचा 'आरोग्य उत्सव'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

'ध्यानी मनी, चिंतामणी' म्हणत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात दरवर्षी हजारो भाविक येतात. पण यावर्षी गणेशोत्सवावर कोरोना व्हायरसचं सावट असल्याने चिंचपोकळीच्या चिंतामणी उत्सव मंडळानं एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

भव्य दिव्य मूर्ती हे चिंचपोकळी मंडळाची खासियत. गेल्या अनेक वर्षांपासून चिंचपोकळी मंडळ २२ फुटांची मूर्ती स्थापित करते. पण यावर्षी मंडळाने २२ फुटाची मूर्ती स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पोलीस यंत्रणा, जनतेचं आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार करून मंडळानं यंदा गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा खंडित होऊ न देता मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या