अभ्यंगस्नानाच्या परंपरेमागे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्थान केलं जातं. पहाटे सूर्योद्यापूर्वी उठून अंगाला तिळाचे तेल लावून मालिश करून, औषधी उटण्यानं आंघोळ केली जाते. पण फक्त एकाच दिवशी अभ्यंगस्थान न करता दररोज करणं फार आरोग्यदायी आहे.

  • संशोधनातून समोर आलं आहे की, सुगंधी तेलानं केलेल्या मालिशमुळे ९० टक्के ताण कमी होतो.
  • ताण कमी झाल्यानं हृदयाचा नसा आणि रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन रक्ताभिसरण सुधारते. यामुळे ब्लॉकेजेस होत नाहीत.
  • मालिश केल्यानं रक्तप्रवाह सुरळीत होऊन हायपरटेन्शन आणि रक्तदाबाचा त्रास नाहिसा होतो.
  • अभ्यंगस्थानात उटणं लावलं जातं. उटण्याच्या औषधी गुणधर्मामुळे त्वचेला येणारी खाज कमी होते.
  • डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत तेल लावून मालिश केली जाते. तेलाच्या मालिशनं आणि उटण्यामुळे अकडलेले स्नायू मोकळे होतात.
  • तेलानं नियमित मालिश केल्यानं स्नायू मजबूत होतात. मणक्यात गॅप येणे, हाडं ठिसूळ होणे असे त्रास होणार नाहीत.
  • तेल कोमट करून घ्या. तेलानं मालिश केल्यानंतर अर्धा तास हे तेल अंगात मुरू द्या आणिमग आंघोळ करा.

सूचना : वाचकांनी कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)


पुढील बातमी
इतर बातम्या