साईभक्तांचं अन्नदान

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

माहीम - तुळशी पाइप रोडच्या फुटपाथवर गुरुवारी साईभक्तांनी सुमारे 500 भक्तांसाठी भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं. जवळपास 15 वर्षांपासून इथल्या फूटपाथवर हे साई मंदिर असून, त्याच्या व्यवस्थापनासाठी कोणतंही मंडळ नाही. याची स्थापना कधी झाली, कुणी केली याचा इतिहासही माहिती नाही. या ठिकाणी एका लहान मुलानं साईंचा फोटो ठेवला आणि त्यानंतर हे साईमंदिर झालं, असं सांगण्यात आलं. भंडाऱ्यांसाठी हा मंदिर परिसर आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या