कांदिवली - अवघ्या आठवडयावर नवरात्रोत्सव उत्सव येऊन ठेपलाय. मूर्तीकार देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. कांदिवली पश्चिमेकडील हेमू कलानी रोड इथल्या महेश खोत यांच्या कारखान्यात मूर्ती साकारल्या जात आहेत. वाघावरील दुर्गादेवीला अधिक मागणी असल्याचे महेश खोत यांनी सांगितले. शंभर रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत.