75 हजार गोविंदांसाठी विमा संरक्षण

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीग स्पर्धेदरम्यान थर रचताना होणारे अपघात लक्षात घेऊन 75 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

यासंदर्भात शासन आदेश जारी करण्यात आल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री बनसोडे म्हणाले की, दहीहंडी उत्सवादरम्यान प्रो गोविंदा लीगचे सदस्य असलेल्या गोविंदाला मानवी पिरॅमिड बांधताना अपघाताचा धोका असतो. त्यामुळे काही गोविंदांचा अपघात होण्याची, गोविंदाचा मृत्यू होण्याची किंवा गंभीर जखमी होण्याची शक्यता असते. 

यासाठी 18 ऑगस्ट 2023 च्या शासन निर्णयानुसार विमा प्रदान केलेल्या 50,000 गोविंदांच्या व्यतिरिक्त आणखी 25,000 गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे.


हेही वाचा

Ganpati 2023 : आरे तलावात गणपती विसर्जनास बंदी

पुढील बातमी
इतर बातम्या