सिद्धिविनायकच्या दागिन्यांचा लिलाव

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

प्रभादेवी - दसऱ्यानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात दागिन्यांचा लिलाव झाला. वेगवेगळ्या आकाराचे मोदक, उंदीर, चेन, अंगठ्या, कंठ्या, सोन्याचे कॉईन आणि बिस्किटे यांचा लिलावात समावेश होता. विशेष म्हणजे सोन्याचे कॉईन आणि बिस्किटांची खरेदी जास्त झाली. मंगळवारी सकाळी 11 ते संध्याकाळी पाचपर्यंत हा लिलाव झाला. अनेक भाविकांनी या लिलावाला उपस्थिती दर्शवली.

पुढील बातमी
इतर बातम्या