कांजुरमार्ग - पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी यंदा कांजुरमार्ग पूर्व येथील अचानक मित्र मंडळातल्या युवकांनी कोरडा रंग आणि गुलाल लावून रंगपंचमी साजरी केली. तसेच इतरांनीही पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याची बचत कशी केली पाहिजे यासंदर्भात जनजागृतीही केली. त्याचबरोबर होळीच्या आगीत वाईट व्यसनांची होळी करण्यासाठी तरुण पिढीला आवाहनही केले.