लालबागमध्ये चीनी फटाक्यांचा निषेध

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

लालबाग मार्केट - उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्याचेच पडसाद मुंबईच्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त उमटल्याचं दिसत आहे. लालबाग मार्केटमध्ये व्यावसायिकांनी चिनी बनावटीच्या वस्तू ठेवल्या तर नाहीच, शिवाय बॅनर लावून निषेधही व्यक्त केला. यामध्ये कोणीही चीनी बनावटीच्या फटाक्यांची खरेदी करू नयेत. ते पर्यावरणाला धोकादायक आहेत, असा संदेश देत इथल्या व्यावसायिकांनी बॅनरच्या माध्यमातून ग्राहकांना विनंती केली. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात शत्रूला मदत करून दिवाळी आपण का साजरी करायची? आपण भारतीय बनावटीचा माल वापरला आणि विकला पाहिजे असं या विक्रेत्यांचं मत आहे. संपूर्ण मार्केटमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या