यंदाही गणेशोत्सवात आरोग्यविषयक कार्यक्रमांवर भर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर आल्यामुळं आता मुंबईत गणेशोत्सवाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या नियमांखाली यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, गतवर्षी कोरोनानं मुंबईसह राज्यभरात थैमान घातलं होतं. तसंच, या वर्षीदेखील दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रकोप दिसून आला. त्यातच आता महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळं झालेल्या दुर्घटना व महापुरामुळं दुहेरी संकटाचा सामना महाराष्ट्र करत आहे. हेच लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सवदेखील साधेपणाने साजरा करण्यावर गणेशोत्सव मंडळांचा भर असणार आहे.

गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्याचा मंडळाचा मानस आहे. तसंच, गणेशोत्सवात अतिरिक्त खर्च टाळून ती रक्कम महाराष्ट्रातील पूरग्रस्त व दुर्घटनाग्रस्त गावांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळ आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. तसंच, गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांच्या लसीकरणावरदेखील भर देण्याचे अनेक मंडळांचं म्हणणं आहे. यंदाचा गणेशोत्सवदेखील आरोग्य उत्सव आणि मदत उत्सव म्हणूनच साजरा केला जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारने गणेशोत्सवाची नियमावली जाहीर केली आहे. त्याच नियमांप्रमाणे आता गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळं यंदाही गणेशोत्सवासोबत आरोग्यउत्सव साजरा होणार का हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या