दसऱ्याला झेंडूचा भाव वधारला

  • संचिता ठोसर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

दादर - दसरा, साडेतीन मुहुर्तांपैकी एक. दसऱ्याच्या निमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत ते रंगीबिरंगी झेंडूच्या फुलांनी. शहराच्या मुख्य बाजारांसोबत गल्लीबोळातही झेंडूंची फुले आणि तोरणे दिसतायेत. पण बाजारात झेंडू फुलांचा भाव वधारलाय. शेतकऱ्यांकडून वीस रुपये किलोच्या भावाने झेंडूची खरेदी केला जातेय. मात्र किरकोळ विक्रीत झेंडूचा भाव 80 ते 100 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय. 

बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडुची आवाक आहे. पण तरीही शेतकऱ्यांना याचा योग्य मोबदला मिळाला नाहिये. सणासुदिला फुलांची मागणी वाढेल या आशेने शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने झेंडुची फुले पिकवली. पण शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आलीय.

 

पुढील बातमी
इतर बातम्या