नवरात्रौत्सव २०१९ : यंदा 'हे' आहेत नवरात्रीचे ९ रंग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाऱ्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र! २९ सप्टेंबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. २९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात ९ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर केला जातो. तर विजया दशमी म्हणजे दसरा ८ ऑक्टोबर या दिवशी आहे

महिला वर्गामध्ये नवरात्रीचं एक प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे नवरात्रीचे नऊ रंग. स्त्री शक्तीचा जागर समानतेमधून करण्यासाठी या ९ दिवसांमध्ये महिला प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंग परिधान करतात. घटस्थापनेपूर्वीच अनेक महिला नवरात्रीच्या नऊ रंगांप्रमाणे कपड्यांची तयारी करून ठेवतात. मग यंदा तुमचीही नवरात्रीची तयारी सुरू झाली असेल तर पहा नवरात्रोत्सव २०१९ मध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग आहे?

नवरात्री २०१९

तारीख दिवसरंग

२९ सप्टेंबर

पहिला दिवस

नारंगी

३० सप्टेंबर 

दुसरा दिवस

पांढरा

१ ऑक्टोबर 

तिसरा दिवस

लाल

२ ऑक्टोबर

चौथा दिवस

रॉयल ब्ल्यू

३ ऑक्टोबर

 पाचवा दिवस 

पिवळा

४ ऑक्टोबर 

सहावा दिवस

 हिरवा

५ ऑक्टोबर 

सातवा दिवस 

ग्रे

६ ऑक्टोबर 

आठवा दिवस 

जांभळा

७ ऑक्टोबर 

नववा दिवस 

मोरपंखी

आता कळाले ना यंदा कुठले रंग आहेत ते? चला तर मग लागा तयारीला. तुमच्याकडे कुठल्या रंगाचे कपडे आहेत किंवा नाही आहेत हे आधीच बघा. जर त्या रंगाची साडी किंवा ड्रेस नसेल तर तसे खरेदी करायला. ऐन टाईमाला घाई नको व्हायला.


पुढील बातमी
इतर बातम्या