नवरात्र मंडपातून डेंग्यू, मलेरियाबाबत जनजागृती

  • संचिता ठोसर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - मुंबईत सध्या डेंग्यू-मलेरियासारख्या अाजारांनी थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर नवरात्री मंडपांमध्ये फवारणी व परिसरातील लोकांसाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे डेंग्यू व मलेरियाविषयक प्रतिबंधात्मक कार्यवाहीसह जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नवरात्र मंडपामधूनही जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत ५७० मंडपांमध्ये व आजूबाजूच्या परिसरात जनजागृती करण्यात आली.

डेंग्यू - मलेरियाचा प्रसार करणारे डास साचलेल्या किंवा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच प्रजोत्पादन करतात. ही बाब लक्षात घेऊन नवरात्रीसाठी उभारण्यात आलेले मंडप व मंडपांच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचलेली ठिकाणे शोधण्यात येत असून, ती नष्ट करण्याची अथवा तिथे औषध फवारण्याची कार्यवाही तात्काळ केली जात आहे. तसेच या ठिकाणी धुम्रफवारणी देखील नियमितपणे करण्यात येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या