मनसे कार्यकर्त्यांची वृद्धाश्रमात दिवाळी

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

अंधेरी - अंधेरी पश्चिमेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष, वर्सोवा विधानसभा विभाग संघटक संतोष सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली जीवन आशा श्रद्धा विहार,या वृद्धाश्रमात कार्यकर्त्यांसह दिवाळी साजरी करण्यात आली. वृद्धाश्रमातील 90 आजी-आजोबांना मिठाई आणि भेटवस्तू देण्यात आल्या. या वेळी वृद्धाश्रमाच्या सेविका सिस्टर प्रमोदिनी, राजू राठोड, प्रदीप मुदाळकर ,तनिष्का सोनावणे, अजित चव्हाण, विनय घाग आणि मनसे कार्यकर्तेही उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या