गणेश विसर्जनासाठी ठाण्यात ऑनलाईन तारीख, वेळ बुकिंग करावी लागणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

गणेश विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे पालिकेने वेळ निश्चिती नोंदणी सुविधा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनाला जाण्यापूर्वी विसर्जन स्थळ, दिनांक आणि वेळ ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. १ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू होणार आहे.  

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणालीमार्फत ऑनलाइन वेळ निश्चिती नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. गेल्या वर्षी  ११ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला होता.

गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिकेकडून यंदा ४० ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. डिजीठाणे प्रणालीद्वारे मूर्ती विसर्जन करण्यासाठी ऑनलाइन वेळ निश्चिती नोंदणी सुविधा १३ कृत्रिम तलाव आणि २० स्वीकृती केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. त्यासाठी www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर विसर्जनासाठी वेळ निश्चिती नोंदणी करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या