चिल्ड्रन्स डे स्पेशल

  • रेणुका गरकल & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - व्हेलेंटाइन डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे प्रमाणे चिल्ड्रन्स डे म्हणजेच बाल दिनानिमित्त बाजारात लहानग्यांसाठी अनेक ऑफर आणि स्कीम उपलब्ध करून देण्यात आलीय. बालदिनाचं औचित्य साधत मामागोटोने दहा वर्ष वयोगटातल्या मुलांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ अगदी मोफत उपलब्ध करून दिले आहेत. तर 'ट्रू फिट अँड हिल'ने एकही पैसे न आकारता 12 वर्षाखालील मुलांना त्यांच्या आवडीची हेअर स्टाइल करून दिली आहे. भायखळ्यातील राणी बागेच्या आवारात असलेल्या भाऊ दाजी लाड या संग्रहालायानं लहान मुलांसह त्यांच्या पालकांसाठी पारंपारिक खेळांचं आयोजन केलं होतं. या वेळी पालकांसह मुलांना जुन्या खेळांची माहिती करून देण्यात आली. 

पुढील बातमी
इतर बातम्या