पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळवडीला गालबोट लागण्याची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

धारावी - होळी सणाच्या आधी गर्दुल्ल्यांनी धारावीतल्या नवरंग कंपाऊंडला अड्डा बनवला आहे. हे गर्दुल्ले मुदत संपलेल्या विषारी रंगाच्या गोण्या आणि डबे गोळाकरून झोपडपट्टीबहुल भागात फिरून विकतात. तर धारावीतील गरीब मुले फुकटात मिळणारे रंग घेण्यासाठी या कंपाउंडकडे धाव घेतात. याच विषारी रंगामुळे शेकडो चिमुरडी मृत्यूच्या दाढेत ढकलली गेली होती. त्यामुळे 2012 च्या धुळवडीची पुनरावृत्तीतर होणार नाही ना असा संशय व्यक्त होत आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेल्या विषारी रंगामुळे पाच वर्षांपूर्वी धारावीतल्या नवरंग कंपाऊंडमधील 140 पेक्षा जास्त चिमुरड्यांना विषबाधा झाली होती. सुमारे 20 चिमुरडी मृत्यूच्या दाढेतून कशीबशी बचावली होती. तो दिवस आठवून आजही धारावीकरांच्या अंगाचा थरकाप उडतो. या घटनेनंतर नवरंग कंपाउंडलगतच्या पाच कंपन्यांवर थातुरमातुर कारवाई करण्यात आली. मात्र आजही परिस्थिती जैसे थे असल्याचं स्थानिक समाजसेवक फक्रुल इस्लाम शेख आणि डॉ. युसूफ खान यांनी निदर्शनास आणून दिले. या धक्कादायक घटनेनंतर ना पोलीस जागे झाले ना पालिका प्रशासन? त्यामुळे पुन्हा एकदा धुळवडीच्या लोकप्रिय सणात विघ्न येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या