परळमध्ये साई भंडारा

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

परळ - भोईवाडा येथील धाकटी शिवडी परिसरात 70 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या साईबाबा मंदिरात दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त साई भंडारा आयोजित करण्यात येतो. यंदाही साई भंडारा दुपारी 12 वाजल्यापासून आयोजित करण्यात आला होता. हे मंदिर साईबाबांचे निस्सिम भक्त असलेल्या सीताराम महाराज यांनी 70 वर्षांपूर्वी बांधले असून, शिवडीमध्ये साईबाबांचे वास्तव्य आहे अशी त्यांची श्रद्धा होती. ही श्रद्धा येथे राहणाऱ्या प्रत्येक साईभक्तांच्या मनात रुजली आणि प्रत्येकानं या मंदिरात पूजा अर्चा सुरु केली. महाराजांनी 1962 मध्ये या मंदिरा शेजारी समाधी घेतली. मात्र येथील स्थनिकांनी साईबाबांच्या सेवेमध्ये कोणताही खंड न पाडता हा वसा चालू ठेवला असून, दरवर्षी येथे भंडाऱ्याच्या माध्यमातून 5 हजाराहून अधिक नागरिक अन्नग्रहण करतात. असे स्थानिक महिला लता कांबळे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या